सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या डंपर चालकावर गुन्हा दाखल

    28-Oct-2025
Total Views |

CIDCO
नवी मुंबई : ( CIDCO ) सिडकोने संपादित आणि विकसित करण्यात येत असलेल्या भूखंडांवर अवैध पद्धतीने डेब्रिज टाकणाऱ्यांविरोधात सिडकोने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत एका डंपर चालकाला रंगेहाथ पकडून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (B.N.S.) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सिडको प्रशासनाला माहिती मिळाली होती की, सिडकोच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. हा अनधिकृत राडारोडा केवळ मानवी आरोग्यास धोकादायक नाही, तर पर्यावरणालाही हानी पोहोचवत आहे. ही अनधिकृत डंपिंग थांबवण्यासाठी, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा, अभियांत्रिकी आणि पोलीस विभागाचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडको क्षेत्रात गस्त सुरू केली दुपारी ३:०० ते ५:३० या वेळे पनवेल पश्चिम, सेक्टर-१६, भूखंड क्र. ०१येथे रफ़ीक अहमद सिद्दीकी (वय ३१), रा. नायकी नगर, आझमी गल्ली, चेंबूर पूर्व, मुंबई. डंपर क्र. MH-11-DD-2370 रफ़ीक अहमद सिद्दीकी याला त्याच्या डंपरमधून मानवी जीवन/आरोग्यासाठी घातक असलेला मलबा अनधिकृत भूखंडावर टाकताना (खाली करताना) रंगेहात पकडण्यात आले.
 
 
या प्रकरणी, डंपर चालक रफ़ीक सिद्दीकी याच्या विरोधात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २१६/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता (B.N.S.) च्या कलम २७३ अंतर्गत दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडकोने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, सिडको परिसरात कोणीही अनधिकृत डेब्रिज टाकताना आढळल्यास, त्याची माहिती सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cidco.maharashtra.gov.in) किंवा संबंधित पोलीस स्टेशनला त्वरित कळवावी. सिडको अशा अनधिकृत डंपिंगवर कठोर कारवाई करणे सुरूच ठेवणार असल्याचे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सांगितले