मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) आज जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहेत ते आजचे स्वयंसेवक आहेत, आणि जे नाहीत ते उद्या नक्कीच स्वयंसेवक होतील यामध्ये कर्नाटकचे मंत्री प्रियांक देखील असणार आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राम माधव यांनी व्यक्त केले. बेंगळुरू येथे मंथना दरहल्ली यांनी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष' या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले की, संघाचे कुणाशीही वैर नाही. इतरांना वाटतं की संघ त्यांचा शत्रू आहे, पण संघ कोणालाही शत्रू मानत नाही. संघ सर्व भारतीयांना संभाव्य स्वयंसेवक मानतो. संघाचे कार्य राष्ट्रनिर्माणासाठी आहे आणि विरोधक असले तरी संघ त्यांच्या विरोधात द्वेषभाव ठेवत नाही. संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्य मानवतेसाठी आहे, विरोधासाठी नाही. संघ संवादावर विश्वास ठेवतो, संघर्षावर नाही.
हेही वाचा : CM Devendra Fadavis : "नोटचोरी' बंद झाल्याने 'व्होटचोरी'चा आवाज..."; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
ते पुढे म्हणाले की, संघाने स्थापनेपासूनच सार्वजनिक पद्धतीने कार्य करण्याचा मार्ग निवडला आहे. संघाच्या शाखा सार्वजनिक मैदानात घेतल्या जातात, त्या लपविल्या जात नाहीत. संघाचे प्रत्येक काम समाजासमोर उभे असते. त्यामुळे संघ गुप्त संस्था असल्याचा आरोप कुणी करत असेल तर तो पूर्णपणे निराधार आहे. संघाचा (Rashtriya Swayamsevak Sangh) उद्देश समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणणं हा आहे, राजकीय सत्ताकेंद्र मिळवणं नाही. धर्म, संस्कृती आणि राष्ट्र या तिन्हींच्या आधारावर व्यक्ती घडविणं हीच संघाची दिशा आहे.
संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) कार्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, संघ अनेक प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आला आहे. विरोध, तिरस्कार आणि द्वेष होत असताना देखील संघाने आपले अस्तित्व टिकवले. अन्य कुठली संस्था एवढ्या तिरस्कार आणि विरोधाच्या काळात १०० वर्षे टिकली नसती. संघाने संविधान रक्षणासाठी, गोसंवर्धनासाठी, जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी तसेच आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनर्स्थापनेसाठी काम केले आहे.आजही संघ आता शताब्दीमध्ये पंच परिवर्तन म्हणजे समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्वबोध आणि पर्यावरण या पाच प्रमुख क्षेत्रांतील परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्य करणार आहे.