Ram Mandir : 'रामायण कंट्री'त उभारलं जाणार अयोध्येसारखं भव्यदिव्य राममंदिर!

27 Oct 2025 17:41:22
Ram Mandir
 
मुंबई : (Ram Mandir) 'रामायण कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये एक भव्य राम मंदिर बांधण्याची तयारी सुरू आहे. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीची नवीन ओळख निर्माण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जाते.
 
त्रिनिदाद आणि टोबॅगो हे कॅरिबियन राष्ट्र असून, अंदाजे १.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात ३,५०,००० हून अधिक हिंदू राहतात. हा अमेरिकेतील असा देश आहे, जिथे हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अजूनही जपली जात आहे आणि रोजच्या जीवनात त्याचा अवलंब केला जात आहे.
 
हेही वाचा :  Reliance Jio : ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर; जिओचा कॉर्पोरेट जिओफाय लाँच!
 
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे मंत्री बॅरी पदरथ यांनी अलीकडेच धार्मिक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत, या उपक्रमाला सरकारचा पाठिंबा असल्याचे जाहीर केला आहे. ते म्हणाले की, "त्रिनिदाद आणि टोबॅगोला 'रामायण देश' (Ram Mandir) म्हणून ओळखले जाते. भारतीय परंपरा शतकानुशतके येथे टिकून आहेत आणि सरकार या वारशाचे संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे."
 
पुढे ते म्हणाले, सरकार या प्रकल्पाकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून देखील पाहत आहे.
 
२०२४ मध्ये अयोध्या येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन करण्यात आले. आता भारताशी सांस्कृतिक संबंध असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात भव्य राममंदिराची निर्मिती केली जाणार आहे. अर्थातच 'रामायण कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात 'मिनी अयोध्या' उभारण्यात येणार आहे.
 
हे वाचलात का ? :  Smart City : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पुदुच्चेरीत २५ ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल
 
मे २०२५ मध्ये, येथे अयोध्येच्या राम लल्लाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला १०,००० हून अधिक भाविक उपस्थित होते. हा कार्यक्रम अयोध्या श्री राम संघटनेचे अध्यक्ष प्रेम भंडारी आणि अमित आलाघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून झाला. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी देश दिवाळी साजरी करत असतानाच राम मंदिराची (Ram Mandir) घोषणा करण्यात आली. त्रिनिदाद आणि टोबॅगोतल्या हिंदूंसाठी हा सुखद धक्काच म्हणावा लागेल.
 
 
Powered By Sangraha 9.0