मुंबई : (Justice Surya Kant) देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. यामुळे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. सरन्यायाधीश गवई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायालयातील दुसरे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) यांचे नाव केंद्र सरकारला सुचवले आहे.
हेही वाचा - Shreyas Iyer Injured: श्रेयस अय्यर ICUमध्ये! कॅच घेताना गंभीर दुखापत; समोर आली मोठी अपडेट
परंपरेनुसार, केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने सरन्यायाधीश गवई यांना याबाबत पत्र लिहून त्यांचे उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याबाबत सांगितले होते. यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) यांच्या नावाची शिफारस करणारा औपचारिक प्रस्ताव केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवला आहे. सरन्यायाधीश गवई हे २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून, त्यांनी पाठवलेल्या शिफारस पत्राला मंजुरी मिळाल्यानंतर २४ नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत (Justice Surya Kant) सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्विकारतील. ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे ५३वे सरन्यायाधीश बनतील.
भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष आहे. सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती यांना हा नियम लागू आहे. नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याअगोदर आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायालयातील एका न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस करतात. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवल्यानंतर पुढील सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.