Smart City : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पुदुच्चेरीत २५ ओलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल

27 Oct 2025 15:32:18

Smart City
 
पुदुच्चेरी : (Smart City) हरित वाहतुकीला चालना देणाऱ्या प्रयत्नाचा भाग म्हणून पुदुच्चेरी रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (PRTC) ने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडून निर्मित 25 इलेक्ट्रिक बसेस सार्वजनिक सेवेत दाखल केल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा उपराज्यपाल के. कैलासनाथन, मुख्यमंत्री एन. रंगासामी आणि सभापती आर. सेल्वम यांच्या उपस्थितीत झाला.
 
हेही वाचा :  पुन्हा अदानी, पुन्हा टूलकिट?
 
स्मार्ट सिटी (Smart City) मिशनचा भाग असलेल्या या ताफ्यात १५ नॉन-एसी आणि १० एसी बसेस आहेत, ह्या बस 9 मीटर लांब असून एका चार्जवर २०० किमी पर्यंत प्रवास करू शकतात. या बसेस शून्य उत्सर्जन, आवाजरहित आणि आरामदायक प्रवास याची पुर्ती करतात. बसेसचे संचालन आणि देखभाल ईव्ही ट्रान्स प्रा. लि. (MEIL समूह) करणार असून १२ वर्षांच्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) अंतर्गत ह्या सेवेचे परिचालन होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0