CM Devendra Fadnavis : साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री म्हणाले...

26 Oct 2025 17:11:02

CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. संपदा मुंडे यानी सुसाईड नोट लिहित “माझ्या मरणास पोलीस निरिक्षक गोपाल बदने जबाबदार आहे. तसेच, प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला," असा आरोप केला होता. त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी थेट भाष्य केले आहे.
 
हेही वाचा :  कोकणातील झोपणाऱ्या सरड्याला काजू-रबराची बाधा; एकसुरी लागवडीचा सह्याद्रीतील सरड्यावर परिणाम
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis) आज फलटणच्या दौऱ्यावर आहेत, हा दौरा रद्द करवा यासाठी अनेकांकडून प्रयत्न करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात थेट भाष्य करत ते म्हणाले, "माझ्या छोट्या भगिनीचा मृत्यू झाला आहे. मला जर थोडी जरी शंका आली असती, तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता".
 
डॉ. मुंडे यांच्या मृत्यूचे राजकारण सहन करणार नाही आणि जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
 
हे वाचलात का ? :  Mumbai Press Club : वादानंतर प्रेस क्लबमधून पत्रकारांनाच काढल बाहेर
 
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला पुण्यातून शनिवार दि. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे अटक करण्यात आली. सध्या त्याला फलटण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0