Swami Vivekananda : पौरुषाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे स्वामी विवेकानंद

26 Oct 2025 17:20:55
Swami Vivekananda
 
मुंबई : (Swami Vivekananda) " स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या काळात मांडलेले विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात. पाश्चिमात्य अभ्यासकांनी स्वामींवर टिपण्णी करताना एके ठिकाणी म्हटलं आहे की पौरुषाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे स्वामी विवेकानंद" असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते मंदार ओक यांनी केले. डोंबिवलीमधल्या एका व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की " स्वामी विवेकानंदांनी (Swami Vivekananda) भारत अगदी जवळून बघितला. त्यांच्या चिंतनातून त्यांनी राष्ट्राच्या पुनरुत्थानसाठी स्वताचा विचार जगाच्या समोर मांडला. ख्यतनाम उद्योजक जमशेठजी टाटा यांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले होते".
 
दि. २६ ऑक्टोबर रोजी डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थान येथे महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा डोंबिवलीच्या माध्यमातून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध व्याख्याते मंदार ओक यांनी ' समग्र स्वामी विवेकानंद' (Swami Vivekananda) या विषयावर उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्या परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या प्रमुख कार्यवाह उमा आवटे पुजारी यांनी केले, यावेळी त्या म्हणाल्या की " जगाला विश्वबुंधत्वाची जाणीव स्वामी विवेकानंदांच्या विचारांमुळे झाली. त्यांनी केलेले कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे." सदर व्याख्यानामध्ये मंदार ओक यांनी स्वामी विवेकानंदांच्या (Swami Vivekananda) जडणघडणीवर प्रकाश टाकला. रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासातील त्यांचे दिवस, गुरु शिष्यांच्या नात्यामधले चैतन्य यावर भाष्य केले. स्वामी विवेकानंदांची ध्यानसाधना, त्यांचा अभ्यास, शिकागो इथल्या धर्मपरिषदेतील त्यांचे अनुभव आदी विषयांवर श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0