वाडा : ( Wada Police ) पोलीस अधिक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हातील अवैध धंदयावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.गुरुवार (ता.२३) रोजी रात्री वाडा पोलीस ठाणे पथक हे हद्दिमध्ये खंडेश्वरी नाका येथे पेट्रोलींग दरम्यान वाहने चेक करत असताना सकाळी ६ वाजताच्या सुमारास संशयित वाहन क्र.MH11-AL-1428 यावरील चालक यास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव मोहम्मद नसिरुद्दीन अन्सारी, वय ३७ वर्षे, रा.आमरा भर्खर, ता. डुमरी, जि. गिरीडीह, राज्य झारखंड असे सांगीतले.
हेही वाचा : मालाड येथे सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या ७ वर्षीय मुलाला कारने चिरडले
नमूद वाहनामध्ये चेक केले असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकुण १८ लाख रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पदार्थ मिळूण आला. आरोपीकडून वाहनासह एकूण ३३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपींविरुध्द वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक केले असून पुढील तपास हा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे व पोलीस उपनिरीक्षक मुंढे हे करत आहेत. सदरची कारवाई ही यतिश देशमुख, पोलीस अधिक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधिक्षक, पालघर, समिर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे, प्रभारी अधिकारी वाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.