मुंबई : (Mumbai Local Updates) मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गावर देखभाल आणि दुरूस्ती कामकाजासाठी रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी दोन्ही मार्गांवर 'मेगाब्लॉक' घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा : Andhra Pradesh : मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत जाहीर
'मेगाब्लॉक'चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११:०५ ते दुपार ३:४५ पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक राहिल.
दरम्यान, सकाळी ११:०५ ते दुपार ३:४५ पर्यंत जलद लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे ते वाशी / नेरुळ दरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत लोकल सेवा रद्द राहतील.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.