Modi's Mission : राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित "मोदीज मिशन" पुस्तकाचे प्रकाशन

25 Oct 2025 14:20:16

Modi
 
मुंबई : (Modi's Mission) लेखक बर्जिस देसाई लिखित "मोदीज मिशन" (Modi's Mission) या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे. या पुस्तकात प्रधानमंत्री मोदी यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा आणि संन्यास या दोन्ही मार्गांचा अनुभव घेतल्यानंतर, संघकार्याद्वारे राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प केला," असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0