मुंबई : (Ladki Bahin Yojana) महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने" साठी ई-केवायसी प्रक्रियेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहिन योजनेसाठीच्या (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारद्वारा तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे, लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यभरातील अनेक माहिलांना आर्थिक मदत मिळाली, मात्र राज्याच्या आर्थिक ताणाचा विचार करून अलीकडेच राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केली. दरम्यान, अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रियेत अडथळे येत होते, त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते अडकले होते.
हेही वाचा : Prashant Bankar : डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर प्रशांत बनकरला बेड्या; पोलिसा निरिक्षकाचा शोध सुरु
शिवाय, या महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री, आदिती तटकरे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "दररोज अंदाजे ४,००,००० ते ५,००,००० लाडक्या बहिणी (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत होत्या. आतापर्यंत, १.१ कोटींहून अधिक लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, ज्यामध्ये अंदाजे २५०,००० महिलांनी त्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेचा ९०% भागच पूर्ण केला आहे."
या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने हा निर्णय घेतला असावा, मात्र त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल. अशी माहिती माध्यमांकडून मिळत आहे.