मुंबई : ( Car Accident ) मुंबईतील मालाड मधील इंटरफेस हाईट्स सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या ७ वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. अन्वय मजुमदार असं या ७ वर्षीय मुलाचं नाव असून सोसायटीच्या बाहेर तो खेळत असताना त्याच्या पायावरून कार गेली. दरम्यान या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंधेरीतील कोकीलाबेन हाँस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी कारचालक श्वेता राठोर या महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला असून घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाला आहे. सूडाच्या भावनेने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप मुलाच्या आईने केला आहे.
हेही वाचा : Prashant Bankar : डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर प्रशांत बनकरला बेड्या; पोलिसा निरिक्षकाचा शोध सुरु
घटनेनंतर कारचालक श्वेता राठोरने वैद्यकीय खर्च देण्याचे कबुल केले. परंतु त्यानंतर कारचालक महिला तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देखील आली नाही असे मुलाच्या कुटुंबाने सांगितले. पोलिस घडलेली घटना सुडाच्या भावनेने घडवून आणली की निष्काळजीपणामुळे घडली याचा तपास करत आहेत.