मुंबई : ( Agra Car Accident ) उत्तर प्रदेशमधील न्यू आग्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नागला बुढी परिसरात शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. पोलीस तपासणीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात एका वेगाने येणाऱ्या कारने सात जणांना धडक दिली. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास दयालबाग रोडवरून ८० फूट रोडमार्गे नागला बुधीकडे एक कार अतिशय वेगाने येत होती. पोलीस त्या ठिकाणी तपासणी करत असल्याचे दिसताच चालकाने गाडीचा वेग आणखी वाढवला. चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि अटकेच्या भीतीने त्याने गाडीवरील नियंत्रण गमावले ( Agra Car Accident ).
सुरुवातीला कारने ( Agra Car Accident ) एका डिलिव्हरी बॉयला धडक दिली. तरीसुद्धा चालकाने गाडी थांबवली नाही. पुढे जाताना कारने नागला बुढी येथील रहिवासी बबली (३८) आणि तिचा मुलगा गोलू यांना, तसेच रंगकाम करणारे दोन मित्र कमल (२३) आणि क्रिश उर्फ कृष्णा (२०) यांना जोरदार धडक दिली.
दरम्यान, नियंत्रण सुटलेली कार १०० मीटर अंतरावर असलेल्या दुभाजकावर आढळून, तीन वेळा उलटली. गाडी शेवटी प्रेमचंद यांच्या घराबाहेर आढळली, जिथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य तंबूखाली बसले होते. या घटनेत प्रेमचंद यांचे पुतणे राहुल आणि वीरेंद्र हे गाडीखाली चिरडले गेले ( Agra Car Accident ).
या घटनेनंतर परिसरात एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ कार सरळ करून अडकलेल्यांना बाहेर काढले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. तर दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
या अपघातामुळे नागला बुढी परिसरात शोककळा पसरली असून पोलीसांनी चालकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.