कोलकाता : ( West Bengal ) पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सूर्यनगर ग्रामपंचायत परिसरातील एका मंदिरात माता कालीची मूर्ती खंडित अवस्थेत सापडल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ही घटना काकद्वीप विधानसभा क्षेत्रात घडली असून, मंदिरात देवीची मूर्ती तुटलेली दिसताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना मंदिरात देवी कालीची मूर्ती खंडित अवस्थेत दिसली. सदर घटना धार्मिक भावना दुखावणारी असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि आंदोलन सुरू केले. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला की हा प्रकार धर्मांध जिहाद्यांनी केला आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटर वर लिहिले की, “या व्हिडिओतील दृश्य बांग्लादेशातील नाही, तर सध्याच्या पश्चिम बंगालचे आहे. मी वारंवार सांगत आलो आहे की पश्चिम बंगालला ‘पश्चिम बांग्लादेश’ बनवण्याचा कट रचला जात आहे. जर हिंदू समाज आता जागा झाला नाही, तर पुढील काळात मोठा धोका आहे.” त्यांनी असा आरोप केला की राज्य प्रशासनाने या घटनेची माहिती बाहेर येऊ नये म्हणून सुरुवातीला प्रयत्न केला.
भाजपच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटर वर पोस्ट केली की, “ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी माता कालीची मूर्ती जेल व्हॅनमध्ये नेली. ही घटना अतिशय लाजिरवाणी असून या अपमानाला लपवण्यासाठी कुठेच जागा नाही.” त्यांनी प्रशासनावरही हा प्रकार लपवण्याचा आरोप केला आणि लिहिले, “पोलिसांनी सुरुवातीला ग्रामस्थांना धमकावले आणि मंदिराचे दरवाजे बंद केले, पण स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर त्यांना ते पुन्हा उघडावे लागले.”
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक