मुंबई : ( Padma Shri Piyush Pandey ) अॅडगुरू पद्मश्री पीयूष पांडे यांचे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ७० वर्षी त्यांनी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘अबकी बार मोदी सरकार’ हा लोकप्रिय नारा त्यांनी भारतीय मतदारांच्या मनामनात पोहोचवला. याशिवाय ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गीत त्यांनी लिहीले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेत्री इला अरुण यांनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली आहे. ते एका संसर्गिक आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी म्हणाले, “पीयूष पांडे त्याच्या क्रिएटीव्हीसाठी ओळखले जात. जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यासोबतचा संवाद कायम स्मरणात राहिल. त्यांच्या जाण्याने अतीव दुःख होत आहे.”, असेही ते म्हणाले. पीयूष पांडेंना भारताचे अॅडगुरू म्हणून गणले जातात. पीयूष पांडेंचा जन्म १९५५मध्ये जयपूर, राजस्थानमध्ये झाला होता. सात बहिणी आणि दोन भाऊ असा परिवाराचा गोतावळा होता. ज्यात सिनेदिग्दर्शक प्रसून पांडे आणि गायिका अभिनेत्री इला अरुण यांचाही सामावेश आहे. त्यांचे शालेय शिक्षण सेंट झेव्हीअर्स स्कुल, जयपूर, सेंट स्टीफन महाविद्यालय, दिल्ली येथून इतिहास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
गाजलेली जाहिरात कॅम्पेन
फेविकोल : “जोड तोड नही सकता”
एशियन पेंट्स : “हर घर कुछ कहेता है”
कॅडबरी डेअरीमिल्क : कुछ खास है
पोलियो : दो बूँद जिंदगी के
पुरस्कार व सन्मान
ओगिल्वी इंडियाचे एग्झिक्युटीव्ह चेअरमन आणि क्रिएटीव्ह ऑफिसर (वर्ल्डवाईड)
पहिले आशियाई कान्स लायन्स फेस्टीवलमध्ये ज्यूरी प्रेसिडेंट
२०१६मध्ये पद्मश्री पुरस्कार
वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी सुरुवात आपले बंधू प्रसून पांडे यांच्यासोबत केली. त्यांनी दैनंदिन वापराच्या वस्तूंना जिंगल्सचा आवाज दिला. १९८२मध्ये त्यांनी ओगिल्वीतून सुरुवात केली. १९९४मध्ये त्यांना ओगिल्वी बोर्डावर नियुक्त केले. २०२४ व्या वर्षी त्यांनी एलआए लीजेंड हा पुरस्कार मिळाला.