Smart Highway : राष्ट्रीय महामार्गांच्या दर्जात सुधारणा होणार; स्मार्ट महामार्ग व्यवस्थापनाकडे वाटचाल

एनएचएआयकडून २३ राज्यांमध्ये उच्च-तंत्रज्ञान सर्व्हे वाहनांची तैनाती

Total Views |
Smart Highway
 
नवी दिल्ली : (Smart Highway) भारताच्या महामार्गांची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरातील २३ राज्यांमध्ये नेटवर्क सर्व्हे वाहन तैनात करणार आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे २०,९३३ किमी राष्ट्रीय महामार्गांचा समावेश असेल.
 
रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी अत्याधुनिक सर्वेक्षण
 
या उपक्रमाचा उद्देश महामार्गांवरील रस्त्यांची सविस्तर माहिती आणि पेव्हमेंटची (pavement) स्थिती तपासणे, विश्लेषण करणे आणि नोंद करणे हा आहे. यामुळे महामार्गावरील फटी, खड्डे आणि पॅचेस यांसारख्या दोषांची वेळेवर ओळख करून दुरुस्ती अधिक प्रभावीपणे करता येईल.
 
AI आधारित डेटा लेक प्लॅटफॉर्मशी संलग्नता
 
एनएचएआयच्या माहितीनुसार, या वाहनांद्वारे गोळा केलेले डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डेटा एका प्लॅटफॉर्म मध्ये एकत्र केला जाईल. त्यानंतर एक विशेषज्ञांचा तज्ज्ञ गट या माहितीचे विश्लेषण करून त्यावर आधारित कार्यवाहीसाठी उपयुक्त निष्कर्ष तयार करेल. या निष्कर्षांच्या आधारे महामार्गांच्या देखभाल आणि व्यवस्थापनासाठी योग्य निर्णय घेता येतील, ज्यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व सुरक्षित बनेल.
 
हेही वाचा :  प्रबोधनकार ठाकरे तलाव सुशोभिकरण कामांमुळे कोणतीही गैरसोय होणार नाही
 
डेटा व्यवस्थापन आणि भविष्यातील वापरासाठी जतन
 
सर्वेक्षणाद्वारे मिळालेली माहिती रोड अॅसेट मॅनेजमेंट सिस्टममध्ये भारत सरकारच्या मानकांनुसार संग्रहित केली जाईल, ज्याचा उपयोग भविष्यातील नियोजन आणि विश्लेषणासाठी केला जाईल.
 
3D लेझर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
 
या सर्वेक्षणात 3D लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे वाहनांचा वापर होणार आहे, जे मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितरीत्या रस्त्यांवरील दोष ओळखू शकतात. या वाहनांमध्ये हाय-रिझोल्यूशन ३६०° कॅमेरे, डिफरेंशियल जीपीएस (DGPS), इनर्शियल मेजरमेंट युनिट्स (IMU) आणि डिस्टन्स मेजरिंग इंडिकेटर्स (DMI) यांसारखी उपकरणे बसवली जाणार आहेत, ज्याद्वारे रस्त्यांची अचूक स्थिती मोजता येईल.
 
हे वाचलात का ? :  मुंबई विमानतळावर सापडला चक्क अ‍ॅनाकोंडा
 
नियमित सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रिया सुरू
 
एनएचएआयच्या माहितीनुसार, प्रत्येक प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर दर सहा महिन्यांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाईल. जेणेकरून महामार्गांची स्थिती सतत अद्ययावत राहील. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पात्र कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
 
स्मार्ट महामार्ग व्यवस्थापनाकडे वाटचाल
 
हा उच्च-तंत्रज्ञान प्रणाली आधारित उपक्रम, पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञान-आधारित विश्लेषण आणि आगाऊ देखभाल नियोजन यांचा समन्वय साधणारा एक आधुनिक दृष्टिकोन सादर करतो.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.