मुंबई : (Jogeshwari Fire ) जोगेश्वरी पश्चिममधील जेएमएस बिजनेस पार्क या इमारतीला गुरूवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० : ३५ च्या सुमारास भीषण आग लागली. माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ही आग या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागली होती. या आगीत इमारतीचे तब्बल चार मजले जळून खाक झाले असून, सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
या आगीची माहीती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले. आग विजण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. आग उंचावर लागल्यामुळे, ती विजवण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे आले, मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल चार तासांनी ही आग विजवण्यात यश आले आहे.
हेही वाचा : मुंबई विमानतळावर सापडला चक्क अॅनाकोंडा
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याची निदर्शनास आले आहे. जेएमएस बिजनेस पार्क (Jogeshwari Fire ) या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र नसताना देखील मोठ्या प्रमाणात गाळे भाड्याने देण्यात आले होते. या संदर्भात पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आगीची घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. सध्या ही आगी कशामुळे लागली, भोगवटा प्रमाणपत्र नसताना गाळे भाड्याने कसे देण्यात आले आणि पालिकेने याकडे दुर्लक्ष का केले या संदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, १६ ते १७ लोकांना या आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर सध्या जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी कार्यालये असल्यामुळे, आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता होती, मात्र मुंबई अग्निशमन दलाच्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. १० : ३५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आजुबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले, त्यानंतर १० : ५१च्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केले.