ठाणे : ( Cricket ) यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात देत दैवेज्ञ क्रिकेट क्लबने १४ वर्ष वयोगटाच्या तिसऱ्या शताब्दी चषक एमसीए निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतले स्थान निश्चित केले. पहिल्या डावातील १४८ धावांचा पिछा करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाला १०८ धावांवर रोखत दैवेज्ञ क्रिकेट क्लबने स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २ बाद ६० धावसंख्येवरून पुढे खेळताना यजमानांचा डाव १०८ धावांवर आटोपला.
अभय पाठक ने २७ धावांत ४ बळी मिळवत संघाला सामन्यात वर्चस्व मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. वेदांत येल्लाला आणि क्रिष्णा संतोषने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. कार्तिकेय शर्माने नाबाद ३१ आणि आरुष खंदारेने २७ धावा केल्या. दुसऱ्या डावात क्रिश बागमरच्या ५१ धावांच्या जोरावर दैवेज्ञ क्रिकेट क्लबने १०५ धावापर्यंत मजल मारली. या डावात पार्थ राऊतने चार आणि चिन्मय देशपांडेने तीन फलंदाज बाद केले. तर खेळ संपला तेव्हा स्पोर्टिंग क्लब कमिटीने बिनबाद ४८ धावा केल्या. विहान अस्वलेने नाबाद ३३ आणि आरुष खंदारे ११ धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक : दैवेज्ञ क्रिकेट क्लब: पहिला डाव : सर्वबाद १४८. स्पोर्टिंग क्लब कमिटी : पहिला डाव सर्वबाद १०८ ( कार्तिकेय शर्मा नाबाद ३१, आरुष खंदारे २७, अभय पाठक १०- ४- २७- ४, वेदांत येल्लाला ५- ३- १७- २, क्रिष्णा सांगवे ८.३- १- १६- २. दैवेज्ञ क्रिकेट क्लब : दुसरा डाव : सर्वबाद १०५ ( क्रिश बागमर ५१, पार्थ राऊत १३- १०- ६- ४, चिन्मय देशपांडे १७.३- ८- २५- ३. स्पोर्टिंग क्लब कमिटी : दुसरा डाव : बिनबाद ४८(विहान अस्वले नाबाद ३३, आरुष खंदारे नाबाद ११). सामनावीर - क्रिश बागमर.