मुंबई : (Sanjay Raut) अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजपच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात ‘मी स्वत: भाजपचा (BJP) आणि पंतप्रधान मोदींचाही (PM Narendra Modi) भक्त आहे’, असं विधान केलं होतं. आता त्यांच विधानावर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोठारेंवर जोरदार निशाणा साधलाय.
नेमकं काय म्हणाले होते महेश कोठारे?
अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात म्हणाले, “या अशा कार्यक्रमांना येऊन इतका आनंद होतो, हा आपला घरचा कार्यक्रम आहे. भाजपा (BJP) म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी मोदींचाही (PM Narendra Modi) भक्त आहे.” असं ते म्हणाले.
पुढे ते राजकारणावर बोलताना म्हणाले, “मुंबईवरती कमळ फुलेल, असेल याची मला खात्री आहे. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की, आपण नुसता एक कॅंडिडेट्स निवडून देत नाहीत, एक मंत्री निवडून देत आहोत. तर तसंचं यावेळेला आपल्याला या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर इथून निवडलेला असेल”, असं म्हणतं महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
संजय राऊत कोठारेंना काय म्हणाले?
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या विधानावर बोलताना म्हणाले... “आता ते भाजपचा महापौर होईल म्हणतात. नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचे सिनेमे फक्त भाजच्या लोकांनी बघितलेले नाहीत. तात्या विंचू चावेल तुम्हाला, असं बोलला तर तात्या विंचू (Tatya Vinchu) हा मराठी माणूस होता. रात्री येऊन चावा घेईल, तुमचा गळा दाबेल”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.