मुंबईमध्ये नऊ तृतीयपंथींनी उचललं टोकाचं पाऊल! फिनाइल पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न...

21 Oct 2025 17:11:48

Transgender
 
मुंबई : ( Transgender ) मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नऊ तृतीयपंथींनी फिनाइल पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्या सगळ्यांना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, मानसिक त्रास आणि बदनामीला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
दरम्यान, कृष्णा अडेलकर या व्यक्तीचा या घटनेशी संबंद्ध असल्याचे पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वीच गोवंडी येथून ज्योती मा किन्नर नावाने वावरणार्‍या बाबू आयन खान या बांगलादेशी इसमाला पोलीसांनी पकडले असून त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर कृष्णा अडेलकर याने प्रसारमाध्यमांवर जाहिर केले की, बाबू आयल खान आणि त्याचा गुरू सलमा खान हे बांगलादेशातील मुलांना आणून त्यांना तृतीयपंथी म्हणून उभे करतात आणि वस्तीत त्यांना भीक मागायला लावतात, तसेच लैंगिक व्यवसायाच्या नावाखाली चोरी आणि खंडणीचे एक मोठे रॅकेट देखील चालवतात.
 
हेही वाचा : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! लग्नाची पत्रिका देऊन परतणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
 
मुंबईतील बहुतांश तृतीयपंथी हे बांगलादेशी आहेत. कृष्णा अडेलकरांच्या या वक्तव्यामुळे तृतीयपंथींची बदनामी झाली त्यामुळे त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असवा, असे म्हटले जात आहे. यावर, किन्नर मा संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान यांनी म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखेारांना पोलीसांनी पकडावे त्यासाठी आमचे त्यांना समर्थन आहे. मात्र, किन्नर मा संस्थेला बदनाम करणार्‍या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्याला अटक व्हावी. जर न्याय मिळाला नाही, तर आम्ही आंदोलन करू.
सध्या याबाबत पार्कसाईट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास घेतला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0