संघ स्वयंसेवकांना शिवीगाळ करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल!

    21-Oct-2025   
Total Views |

Rashtriya Swayamsevak Sangh 
 
मुंबई : ( Rashtriya Swayamsevak Sangh )  छत्रपती संभाजीनगर येथील 'शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय' परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक 'जॉईन आरएसएस' अभियानाद्वारे धार्मिक अजेंडा राबवत असल्याचा आरोप काही तथाकथित आंबेडकरवाद्यांनी केला होता. त्याचबरोबर स्वयंसेवकांना शिवीगाळ देखील केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले होते. याप्रकरणी तीन जणांविरोधात वेदांत नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे. या तिघांनीही केलेले कृत्य हे सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
हेही वाचा : हेडगेवार : ए डेफिनिटिव्ह बायोग्राफी - अमूल्य संदर्भग्रंथ
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात तथाकथीत आंबेडकरवादी हे संघ स्वयंसेवकांना शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित तिघांविरोधात समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. या दोन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तातडीने कठोर भूमिका घेत तिघांविरोधात गुन्हे दाखल केले. एफआयआर कॉपीनुसार, भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, २९९, २९६, ३५१(२), ३५२, ६७ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंकर्गत कलम ६७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सध्या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक