मुंबई : ( Dubai ) दिवाळी हा सण फक्त भारतासाठी मर्यादित नसून, जगभरात राहणाऱ्या सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा आणि आनंदमयी असतो. याचीच एक झलक म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दुबईतील दिवाळीचा व्हिडीओ. यंदा दुबईमध्ये दिवाळीचे जबरदस्त वातावरण दिसत आहे. इमारती आणि अपार्टमेंट्स दिव्यांनी उजळून निघाले आहेत. दुबईत राहणाऱ्या भारतीयांनी अगदी भारतीय पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे.
दरम्यान दुबईत राहणाऱ्या निकिता पँचोली या तरुणीने कारमधून काढलेला दुबईतील दिवाळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक इमारती आणि घरे सुंदर लाईट्सने सजलेली दिसतात. शिवाय या व्हिडीओला तिने 'दुबई दिवाळीसाठी सज्ज आहे' असे कॅप्शन देखील दिले आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेक भारतीय या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. "सणांच्या वेळी खरच घरची आठवण येते", "खुप सुंदर! दुबईकडून दिवाळीच्या शुभेच्छा", "अरे माझं घरही दिसतंय यात!", शिवाय "दुबई खरंच प्रत्येक संस्कृतीला मान देतं" अश्या विविध भावनिक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.