दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी कालवश! 'या' कारणामुळे अभिनेत्याने गमावले प्राण

    21-Oct-2025
Total Views |

Asrani

 
 
मुंबई : ऐन दिवाळीत सिनेविश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. काल २० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन झालं आहे. शोले, चुपके - चुपके, अभिमान यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारणारल्या होत्या. याशिवाय “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” या एका डायलॉगने त्यांना मोठी प्रसिद्धी दिली होती. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवाळीत असरानी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असरानी यांच्या जाण्याने सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, अभिनेते असरानी यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांची एक-एक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. असरानी यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण अखेर उघड झाले आहे. याविषयी त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी माहिती दिली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले,

‘ते अस्वस्थ झाले होते आणि श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नंतर सांगितलं की, त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाला आहे. दुपारी ३ वा. च्या सुमारास त्यांचे निधन झालं.”
दरम्यान, त्यानंतर काही तासांतच असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २० ऑक्टोबरच्या संध्याकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यविधी पार पडले. यावेळी त्यांचे जवळचे कुटुंब आणि मित्रांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

असरानी यांची मोठी कारकिर्द होती, त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियां’ या सिनेमातून त्यांनी आपल्या करियरला सुरुवात केली होती. त्यांनी केवळ विनोदीच नाही तर गंभीर आणि सहाय्यक भूमिका देखील सहजतेने केल्या ‘नमक हराम’, ‘बावर्ची’, ‘गुड्डी’, ‘चुप चुप के’, ‘हेरा फेरी’, ‘हलचल’, ‘दीवाने हुये पागल’ आणि ‘वेलकम’ सारख्या सुपरहीट सिनेमांमध्ये त्यांनी केलं होतं.