मुंबई : (Amazon web service) दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच, जगातील बऱ्याच मोठ्या वेबसाइट्स आणि ॲप्सना इंटरनेट बिघाडाला सामोरे जावे लागले आहे. सोमवार दि. २० ऑक्टोबर रोजी ॲमेझॉनच्या क्लाउड डिव्हिजन AWS, रॉबिनहूड, स्नॅपचॅट आणि परप्लेक्सिटी एआयसह अनेक लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यत्यय आला. आउटेज- ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटच्या बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोठ्या भागाला पॉवर देणाऱ्या ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसमुळे (Amazon web service) ही समस्या उद्भवली.
दरम्यान या घटनेचा सर्वात मोठा फटका हा आशिया आणि अमेरिकेला बसला आहे. युनायटेड स्टेटमधील तब्बल २००० हून अधिक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टर या वेबसाइटवर त्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून इंटरनेट आउटेजची सुरूवात झाली. ॲप्स आणि वेबसाइट्स लोड होत नव्हत्या किंवा अतिशय संथ गतीने चालत होते. त्यामुळे जगातील मोठ्या इंटरनेट कंपन्यांच्या कामकाजात अडथळे निर्माण झाले.
हेही वाचा : ‘कफाला’ प्रणालीचा अंत
पर्प्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी एका पोस्टमध्ये पुष्टी केली की व्यत्ययांचे मूळ कारण AWS (ॲमेझॉन वेब सर्व्हिस) (Amazon web service) संबंधित समस्या होती, ज्यामुळे कंपनीच्या कामकाजावर तात्पुरता परिणाम झाला.
(Amazon web service) ॲमेझॉन वेब सर्व्हिस आउटेजमुळे प्रभावित झालेल्या साइट्स आणि ॲप्सची यादी
Amazon.com
प्राइम व्हिडिओ
अलेक्सा
रॉबिनहूड
स्नॅपचॅट
पर्प्लेक्सिटी एआय
व्हेनमो
कॅनव्हास बाय इन्स्ट्रक्चर
क्रंचयरोल
रोब्लॉक्स
व्हॉटनॉट
रेनबो सिक्स सीज
कॉइनबेस
कॅनव्हा
ड्युओलिंगो
गुडरीड्स
रिंग
द न्यू यॉर्क टाइम्स
लाइफ३६०
फोर्टनाइट
अॅपल टीव्ही
व्हेरिझॉन
चाइम
मॅकडोनाल्ड्स अॅप
कॉलेजबोर्ड
वर्डल
पबजी बॅटलग्राउंड्स
ओपनएआय
व्हिमिओ
ट्विच
शॉपिफाय
गुगल मॅप्स
क्लॉड (अँथ्रोपिक)
कर्सर
डायलपॅड
मायक्रोसॉफ्ट अझ्युर
रीकॅप्चा
यूट्यूब
जीमेल
खान अकादमी
एनपीएम
ड्रॅगन बॉल
एटी अँड टी
डोअरडॅश
स्पॉटिफाय
गुगल क्लाउड
डिस्कॉर्ड
गुगल
गुगल मीट
कॅरेक्टर.एआय
रॉकेट लीग
क्लाउडफ्लेअर
गुगल नेस्ट
पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड गेम
फुबोटीव्ही
हायलेव्हल
बॉक्स
एट्सी
यातील काही ॲप्स आता सुरळीत सुरू झाले आहेत, मात्र ॲमेझॉन वेब सर्व्हिस ही समस्या का उद्भवली याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही.