कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(माओवादी) मध्ये पडली फुट

02 Oct 2025 17:01:00

तेलंगणा : हिंसा सशस्त्र संघर्ष थांबवून नक्षल्यांनी कायदासुव्यवस्थेपुढे आत्मसमर्पण करायचे की हिंसा संघर्ष कायम ठेवायचा यावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी पार्टीमध्ये दोन गट पडल्याचे उघड झाले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)चा वैचारीक प्रमुख आणि मुख्य प्रवक्ता वेणुगोपाल राव उर्फ सोनू (७०) याने नुकतेच एक पत्र प्रसिद्ध केले आहे त्यात त्याने नमुद केले आहे की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) पार्टी ला वाचवायचे असेल तर सशस्त्र संघर्ष थांबवण्याची वेळ आली आहे..कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)ची केंद्रीय समिति (उउ) आणि तेलंगाना राज्य समिति ने सोनू च्या प्रस्तावाला विरोध केला. तेलंगना राज्य समितीचा प्रवक्ता जगन याने सोनूच्या प्रस्तावाला विरोध करत म्हंटले होते की संघर्ष कायम राहणार. मात्र त्यावरून त्याच्याच पक्षातील लोकांनी त्याला गद्दार वगैरे म्हणत त्याची निंदा केली होती.

छत्तीसगढ,झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण करत नव्याने आयुष्य जगायचे ठरवले. त्यातच देशभरात नक्षलग्रस्त भागात सुरक्षादल सरकार प्रशासनाच्या कारवाया तीव्र झाल्या. त्यामुळे कारवाईमध्ये अनेक नक्षली मारले गेले. तसेच भाजप केंद्र आणि राज्य सरकारमुळे नक्षलग्रस्त परिसरातही विकासाचे जाळे पोहचले आहे. त्यामुळे नक्षल्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळणे कमी झाले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी पक्षाची शक्तीला हालचालीस वाव मिळेनासा झाला. त्यामुळेच वेणुगोपाल याने सशस्त्र संघर्ष थांबवण्याची वेळ आली आहे असे म्हंटले आहे. आपल्या विधानाला पक्षातील बहुसंख्यकांचे समर्थन आहे असेही त्याचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या माहितीप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी च्या केंद्रिय समितीमध्ये केवळ १० जणच उरले आहेत.

कोण आहे वेणुगोपाल

वेणुगोपाल हा माओवादी नेता मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याचा छोटा भाऊ आहे. २०११ साली पश्चिम बंगाल मध्ये पोलीसां सोबतच्या चकमकीमध्ये तो मारला गलेा होता.त्यानंतर किशनजीची पत्नी पद्मावती हिने तेलगंणा पोलीसांसमोर आत्म समर्पण केले. वेणुगोपला हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीचा प्रमुख वैचाारीक नेता आणि प्रवक्ता आहे.


Powered By Sangraha 9.0