केडीएमसी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी अभिवादन

02 Oct 2025 14:43:23

कल्याण : जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे "राष्ट्रपिता महात्मा गांधी" व जय जवान जय किसान या घोषणेचे प्रणेते ,भारताचे माजी पंतप्रधान "लालबहादुर शास्त्री" यांच्या जयंती दिनी गुरूवारी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित उपायुक्त रामदास कोकरे ,संजय जाधव, माजी नगरसेवक महेश गायकवाड,उप अभियंता भागवत पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, मुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टीन घुटे,सुरक्षा अधिकारी भरत बुळे,सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी,नागरिक यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी उद्यानातील, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयास परिमंडळ- 2 चे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सहा.आयुक्त राजेश सावंत व इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक यांनी देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.


Powered By Sangraha 9.0