मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील पाच आरोपींचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (छखअ) मुंबईतील विशेष न्यायालयाकडे केली आहे. सदर मागणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ५१ अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. रोना विल्सन, महेश राउत, आनंद तेलतुंबड़े, गौतम नवलखा आणि हनी बाबू या पाच आरोपींचे पासपोर्ट जप्त करावे तसेच त्यासाठीचा कालावधी न्यायालयाने निर्धारीत करावी अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मागणी केली आहे . या मागणीच्या आधारे, न्यायालयाने संबंधित आरोपींना त्यांचे उत्तर दाखल करण्याचे निदश दिले आहेत. तसेच यासंदर्भातली पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.