काँग्रेसशासीत हिमाचल प्रदेशात बालक झाले अस्पृश्यतेचा बळी

02 Oct 2025 16:51:41

हिमाचल प्रदेश :
सिमलापासून जवळच असलेल्या लिम्ब्डा गावात १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या पालकांच्या मते त्याने गावातील एका सवर्ण महिलेच्या घराला स्पर्श केला होता. ते सहन न होऊन तीच्यासह आणखी दोघीजणींनी त्याला मारहाण केली आणि गोशाळेत डांबून ठेवले होते. हा अपमान सहन न होऊन त्याने विष प्राशन केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंमाचल प्रदेशचे काँग्रेस शासन पुन्हा चर्चेत आले आहे. शाहु पुले आंबेडकरांचे नाव घेणार्‍या काँग्रेसच्या राज्यात अस्पृश्यतेच्या अपमानाने बालकाचा बळी गेला आहे.

या घटनेची गंभिर दखल हिमाचल राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने घेतली आहे. आयोगाने राज्य पोलीसांना दोन दिवसात अहवाल सादर करावा, तसेच पिडीत कुटूंबाला सुरक्षा देण्याचे असे दिले आहेत. याबाबत हिमाचल राज्याच्या डिआयजी रंजना चौहान यांनी म्हंटले की सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कुलदिप धिमान यांनी म्हंटले आहे की एसएसटी अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक होते.


Powered By Sangraha 9.0