नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन केले. याप्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा असते," असे त्यांनी सांगितले.