मुंबई : (Diwali with Tribal Students ) आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने काळाचौकी येथील बालवीर नवरात्र उत्सव मंडळातर्फे गोठवली येथील आदिवासी वस्ती पाड्यातील विद्यार्थ्यांसोबतआदिवासी साजरी करण्यात आली.
यावेळी गोठवली खालापूर येथील दुर्गम भाग असलेल्या आदिवासी वस्तीपाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना कॉम्पुटर, वॉटर प्युरिफायर, प्रिंटर तसेच शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. तसेच सर्व मुलांबरोबर फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली, अशी माहिती मंडळाचे खजिनदार प्रणय लाड यांनी दिली.