Ashish Shelar : अभिनेत्री संध्या यांना आशिष शेलार यांनी मानवंदना कार्यक्रमात वाहिली श्रद्धांजली
19-Oct-2025
Total Views |
मुंबई : (Ashish Shelar) भारतीय चित्रपटसृष्टीतील १९५०-६० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे संध्या शांताराम. टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभावातून बोलणाऱ्या संध्या यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. नुकतेच वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. या गुणी अभिनेत्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका खास कार्यक्रमाचे आयोजन कालनिर्णय कडून करण्यात आले होते . पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे सहकार्य लाभलेल्या या कार्यक्रमात दिवंगत अभिनेत्री संध्या यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनीही उपस्थित राहून संध्या यांना श्रद्धांजली वाहिली.
हा कार्यक्रम प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये पार पडला. या कार्यक्रमात व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित आणि विश्राम बेडेकर लिखित 'अमर भूपाळी' हा सिनेमा दाखवण्यात आला . ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे यांनी संध्या यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत 'अमर भूपाळी' या चित्रपटाविषयी भाष्य देखील केले. यावेळी त्यांनी संध्या यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
तसेच मंत्री आशिष शेलार यांनीही व्ही शांताराम आणि संध्या यांची खास आठवण सांगितली जेव्हा त्याना व्ही शांताराम यांच्या हातून पारितोषिक मिळाले होते. याशिवाय संध्या यांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग आला याचा विशेष आनंद असल्याचेही ते म्हणाले.