मुंबई : ( Kabaddi Tournament ) शालेय क्रीडा स्पर्धांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेस स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्यापासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांचे सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षातील नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘कबड्डी’ स्पर्धेचे आयोजन डॉ. सी.व्ही.सामंत महाविद्यालय, तुर्भे येथील शाळेच्या मैदानावर तीन दिवस करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षाआतील मुले व मुलींच्या गटात एकूण २२४ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा शुभारंभ शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ तुर्भे या संस्थेचे सरचिटणीस श्री.चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनिल कोळी, क्रीडा शिक्षक श्री.वसंत पाटील, श्री.हणमंत डुबल, श्री.संतोष भोईर, श्री.अतुल पाटील व इतर सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेतील १४ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी रा. फ. नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. १७, जुईनगर, नेरूळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रा. फ. नाईक महाविद्यालयाच्या संघाने २३:१८ अशा ०५ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरी उपांत्य फेरी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. १८, सानपाडा आणि डॉ. सी. वी. सामंत विद्यालय तुर्भे यांच्यात झालेल्या लढती मध्ये महापालिका शाळा क्रं. १८, सानपाडा शाळेच्या संघाने ३०:२५ अशा ०५ गुणांने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या वयोगटातील मुलांची अंतिम सामना वी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. १८, सानपाडा आणि रा.फ.नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात महापालिका शाळा क्रं. १८, सानपाडा शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २८:२५ अशा ०३ गुणाने जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धेतील १४ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी डी. आर. पाटील विद्यालय, तुर्भे आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.४२, घणसोली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात डी.आर.पाटील विद्यालय, तुर्भे शाळेच्या संघाने २८:०८ अशा २० गुणाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी उपांत्य फेरी रा. फ. नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे आणि ऐरोली माध्यमिक विद्यालय, ऐरोली यांच्यात झालेल्या लढती मध्ये रा .फ.नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे शाळेच्या संघाने ३५:०६ अशा २९ गुणाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
या वयोगटातील मुलांची अंतिम सामना रा.फ.नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे आणि डी. आर. पाटील विद्यालय, तुर्भे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक महाविद्यालय बोनकोडे कोपरखैरणे शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत १९:१८ अशा ०१ गुणाने सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील १७ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी रा. फ. नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १०६, कोपरखैरणे यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रा.फ.नाईक महाविद्यालय बोनकोडे कोपरखैरणे शाळेच्या संघाने २९:०५ अशा २४ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
हे वाचलत का ? - ‘कॅन्डेला’ची सफर...
दुसरी उपांत्य फेरी डॉ.सी.वी. सामंत महाविद्यालय, तुर्भे आणि शेतकरी शिक्षण प्रसारक, घणसोली यांच्यात झालेल्या लढती मध्ये डॉ.सी.वी.सामंत महाविद्यालय,तुर्भे शाळेच्या संघाने २३:०४ अशा १९ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या वयोगटातील मुलांची अंतिम सामना रा.फ. नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे आणि डॉ.सी.वी.सामंत महाविद्यालय, तुर्भे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे शाळेच्या संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत २६:२२ अशा ०४ गुणाने सामना जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
१७ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१०४, रबाले आणि डॉ. सी. महाविद्यालय तुर्भे यांच्यात झालेल्या सामन्यात नमुंमपा शाळा क्रं.१०४,रबाले शाळेच्या संघाने २६:१३ अशा १३ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी उपांत्य फेरी रा.फ.नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे आणि नमुंमपा शाळा क्रं.११४, कोपरखैरणे यांच्यात झालेल्या लढती मध्ये रा.फ.नाईक महाविद्यालय, कोपरखैरणे शाळेच्या संघाने २२:०९ अशा १३ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
या गटातील अंतिम सामना रा. फ. नाईक महाविद्यालय कोपरखैरणे आणि डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय, तुर्भे यांच्यात झालेल्या सामन्यात रा .फ.नाईक महाविद्यालय कोपरखैरणे शाळेच्या संघाने २४:०९ अशा १५ गुणाने जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात पहिली उपांत्य फेरी रा. फ. नाईक महाविद्यालय, बोनकोडे कोपरखैरणे आणि साईनाथ कॉलेज, वाशी यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रा. फ. नाईक महाविद्यालय कोपरखैरणे कॉलेजच्या संघाने ३२:०७ अशा २५ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरी उपांत्य फेरी डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय,तुर्भे आणि स्टर्लिंग ज्युनिअर कॉलेज, नेरुळ यांच्यात झालेल्या अतिशय चुरशीची लढती मध्ये डॉ.सी.वी. सामंत महाविद्यालय, तुर्भे शाळेच्या संघाने ३०:२८ अशा ०२ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या मुलांच्या गटातील अंतिम सामना रा. फ. नाईक महाविद्यालय बोनकोडे कोपरखैरणे आणि डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय तुर्भे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक महाविद्यालय कोपरखैरणे कॉलेजच्या संघाने २९:१० अशा १९ गुणाने जिंकत अजिंक्यपद पटकावून मुंबई विभागस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धेतील १९ वर्षाआतील मुलींच्या गटात पहिली उपांत्य फेरी रा. फ. नाईक महाविद्यालय बोनकोडे कोपरखैरणे आणि कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज वाशी यांच्यात झालेल्या सामन्यात रा .फ.नाईक महाविद्यालय कोपरखैरणे कॉलेजच्या संघाने २०:०७ अशा १३ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी उपांत्य फेरी डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय तुर्भे आणि जे.व्ही.एम. मेहता कॉलेज, ऐरोली यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढती मध्ये डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय तुर्भे कॉलेजच्या संघाने २४:२३ अशा ०१ गुणाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेतील १९ वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामना रा.फ.नाईक महाविद्यालय,कोपरखैरणे आणि डॉ. सी. वी. सामंत महाविद्यालय तुर्भे यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक महाविद्यालय बोनकोडे कोपरखैरणे कॉलेजच्या संघाने २५:०४ अशा २१ गुणांच्या फरकाने जिंकून मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धा आयोजनासाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव श्री.मालोजी भोसले, स्पर्धा निरीक्षक श्री. विशाल गलगुडे व पंच प्रमुख श्री.विवेक मयेकर व इतर सर्व पंच आणि विशेषतः पावसाळा कालावधीतच कबड्डीसारख्या मातीतील मैदानी खेळाचे आयोजन करताना सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा पाऊस आला असतानाही मैदान तयार करण्यासाठी डॉ.सी.व्ही.सामंत महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री.हणमंत डुबल, श्री.वसंत पाटील, श्री.संतोष भोईर व श्री.प्रविण चव्हाण आणि स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना संस्थेचे सरचिटणीस श्री.चंद्रकांत पाटील यांचे सौजन्याने स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे स्वतः उत्तम मॅरेथॉन धावपटू असून महापालिकेच्या माध्यमातून खेळाडूंना क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रही आहेत. आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हंगामात खेळता येईल अशा स्वरुपाची सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. नमुंमपा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४,१७ व १९ वर्षाआतील मुलामुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून पुढील मुंबई विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.