Rajnath Singh : भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला मोठा इशारा, म्हणाले...

18 Oct 2025 18:05:14

RAJNATH SIMGH

मुंबई : (Rajnath Singh) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा देत, शनिवार दि. १८ ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये झलेल्या एका कार्यक्रमात, पाकिस्तानचा प्रत्येक इंच भाग हा भारताच्या 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे आणि 'ऑपरेशन सिंदूर' हे फक्त एक ट्रेलर होते, असे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. एवढे झाल्यानंतर देखील पाकिस्तानने अद्याप भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणे काही थांबवलेले नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सातत्याने भारताविरोधात वक्तव्य करत असतानाच, भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे.
 
हेही वाचा :  सिद्धरामय्या सरकारची कारवाई बेकायदेशीर; निलंबित अधिकाऱ्यासाठी तेजस्वी सूर्या यांची कायदेशीर लढ्याची घोषणा


लखनऊमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, "विजय ही आता आपल्यासाठी मोठी गोष्ट राहिलेली नाही. विजय मिळवणं आपली सवय बनली आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक ट्रेलर होते, त्या ट्रेलरनेच पाकिस्तानला हे जाणवून दिले की जर भारत पाकिस्तानला जन्म देऊ शकतो, तर ते आणखी काय करू शकते याबद्दल मला अधिक काही सांगण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.
 









Powered By Sangraha 9.0