प्रकाशमाळेचा दीपोत्सव

18 Oct 2025 13:02:24

दिवाळीचा उत्सव हा खरेदीचाही महोत्सव! दिवे, पणत्या, कंदील, कपडे या साऱ्यांची खरेदी सुरू असताना, विद्युतरोषणाईची खरेदी तरी मागे कशी राहील म्हणा? मुंबईच्या लोहारचाळीमध्ये विद्युतरोषणाईचे अनेक वेगवेगळे प्रकार ग्राहकांच्या हाती लागतात. काळबादेवी परिसरातील लोहारचाळ म्हणजे ‌‘लाईटिंग‌’ विश्वाचं एक अद्भुत दालनच! याच लोहारचाळीची ही आगळीवेगळी मुशाफिरी...


दरवषप्रमाणे यंदाही लोहारचाळ विद्युतरोषणाईच्या वेगवेगळ्या रंगांनी, प्रकाशाने उजळून निघाली. कमीत कमी किमतीच्या, परंतु तितक्याच आकर्षक दिव्यांच्या माळा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. लोहारचाळीतील विद्युतरोषणाईची विविधता भुरळ घालणारी अशीच...


लोहारचाळीच्या भोवतालचा परिसर गजबजलेला असतो, तो याच विद्युतरोषणाईच्या माळांच्या खरेदी आणि विक्रीने. रात्रीच्यावेळी चाळीच्या बाहेर असलेल्या छोट्या दुकानांमध्ये, फूटपाथवर, विक्रेत्यांची आणि ग्राहकांची गद पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक विद्युतरोषणाई खरेदी करण्यासाठी तरुणांची रीघ लागलेली असतेच. त्याचबरोबर, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सही या जागेला भेट देतात. ही आकर्षक रोषणाई हा अनेकांसाठी ट्रेण्डिंग कंटेंट ठरतो.


कृत्रिम दिव्यांचा आकर्षक लखलखाट अनेकांना भारावून टाकणारा असतो. यावषसुद्धा झाडांच्या कृत्रिम वेली, छोटे छोटे झुंबर यांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे.


विद्युतरोषणाईचा विषय निघाला की बऱ्याचदा, परदेशातून आयात केलेल्या विद्युतरोषणाईच्या माळांची आठवण अनेकांना होते. मात्र, भारतामध्येच तयार केलेल्या स्वदेशी विद्युतरोषणाईच्या माळा आपण लोहारचाळीत खरेदी करू शकतो. सृजन आणि अभियांत्रिकीचा अद्भुत संगम इथे आपल्याला बघायला मिळतो.

छाया : अजिंक्य सावंत,
संकलन : मुकुल आव्हाड



Powered By Sangraha 9.0