
मुंबई : उत्तम सुरु असलेलं करियर, प्रसिद्धी आणि सगळंकाही सोडून अध्यात्माचा मार्ग निवडणं तसं सोपं नव्हे. पण बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ते करुन दाखवलं आहे. आणि ही अभिनेत्री म्हणजेच ग्रेसी सिंग. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘अरमान’ , ‘लगान’ आणि ‘गंगाजल’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री ग्रेसी सिंगने १९९७ साली टीव्ही मालिका ‘अमानत’ मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये संजय दत्तची हिरोईन असलेल्या ग्रेसीने मोठी लोकप्रियता मिळवली होती. तर आजही ग्रेसी तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसते. पण काही वर्षांपूर्वी तिने सिनेमा आणि बॉलिवूडपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी ग्रेसी ब्रह्मकुमारी संस्थेच्या संपर्कात आली. तर २००८ मध्ये आपल्या मॅनेजरच्या निधनानंतर ग्रेसी सिंगने बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटांपासून थोडं अंतर ठेवलं. तिने केवळ स्वतःच्या मनाला भावणारे आणि अर्थपूर्ण प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये ती ब्रह्माकुमारी या अध्यात्मिक संस्थेशी जोडली गेली आणि त्यानंतर तिने अभिनयापेक्षा आत्मिक शांततेचा मार्ग निवडला. ग्रेसीने पुढे दिग्दर्शन आणि लेखनाचीही आवड व्यक्त केली आहे, मात्र प्रसिद्धीपेक्षा तिला वैयक्तिक समाधान आणि आत्मविकास अधिक महत्त्वाचा वाटतो.
ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडल्यापासून ग्रेसी सिंगने पूर्णपणे अध्यात्मिक जीवन स्वीकारलं आहे. ध्यान, सेवा आणि योगाद्वारे ती शांतता आणि समाधान शोधत आहे. या परिवर्तनाचं प्रतिबिंब तिच्या ‘संतोषी माँ’या मालिकेत दिसलं, ज्यात तिने देवी संतोषीची भूमिका साकारली होती. एका बॉलिवूड अभिनेत्रीपासून एक साधक बनण्याचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. लगानमधल्या भूमिकेमुळे ग्रेसी सिंहला रातोरात ओळख मिळाली. याशिवाय ग्रेसी सिंह लगाननंतर मुन्नाभाई एमबीबीएस आणि गंगाजलमध्येही दिसून आली. या दोन्ही चित्रपटांमध्ये ग्रेसी सिंहनं मोलाची भूमिका निभावली. अल्पावधीच बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींमध्ये ग्रेसी सिंहच्या नावाचा समावेश होऊ लागला. पण, आता अभिनेत्रीनं ग्लॅमरस जग आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेलं करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग निवडला.
जरी ग्रेसी आता चित्रपटांपासून दूर आहे, तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या रोजच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.