मुंबई : (Ameet Satam) मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी आज कांदिवली पश्चिम येथील एकता नगर सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी या कामगारांसोबत एकत्र बसून भोजन घेतले आणि त्यांच्या सेवेचा सन्मान केला.
"कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा झाली.या विषयात भाई गिरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत, त्या योजनेच्या कार्यान्वित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली." असे आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी सांगितले.
यावेळी आमदार साटम (Ameet Satam) यांनी मुंबई (Mumbai) शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांचे मनापासून आभार मानले. आमदार अमीत साटम यांनी आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या अंतर्गत उपस्थित कामगारांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या तसेच शहराच्या विकासासाठी त्यांच्या काही महत्वाच्या सूचना देखील नोंदवून घेतल्या.