Gujarat Cabinet Expansion : २६ मंत्र्यांसह गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार; क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपद!

17 Oct 2025 13:32:00

Gujarat Cabinet
 
मुंबई :(Gujarat Cabinet Expansion) भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरात सरकारमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार गुरुवारी १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील १६ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. यानंतर गुजरात सरकारने आज शुक्रवारी १७ ऑक्टोबरला २६ मंत्र्यांसह नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.
 
गुजरात सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे आहेत. यामध्ये क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. हर्ष संघवी हे पहिले शपथ घेणारे होते. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी ते राज्याचे गृहमंत्री होते.
 
गुजरातच्या नवीन कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी :
 
  • भूपेंद्र रजनीकांत पटेल
  • त्रिकम बिजल छंगा
  • स्वरूपजी सरदारजी ठाकोर
  • प्रवीणकुमार माळी
  • ऋषिकेश गणेशभाई पटेल
  • पीसी बरांडा
  • दर्शना एम वाघेला
  • कंत्राटलाल शिवालाल अमृतिया
  • कुंवरजीभाई मोहनभाई बावलिया
  • रिवाबा रवींद्रसिंह जडेजा
  • अर्जुनभाई देवाभाई मोढवाडिया
  • डॉ. प्रद्युम्न वाजा
  • कौशिक कांतीभाई वेकरिया
  • परशोत्तमभाई ओ. सोलंकी
  • जितेंद्रभाई सावजीभाई वाघानी
  • रमणभाई भिखाभाई सोलंकी
  • कमलेशभाई रमेशभाई पटेल
  • संजयसिंह राजयसिंह महिदा
  • रमेशभाई भुराभाई कटारा
  • मनीषा राजीवभाई वकील
  • ईश्वरसिंह ठाकोरभाई पटेल
  • प्रफुल्ल पानसेरिया
  • हर्ष संघवी
  • डॉ. जयरामभाई चेमाभाई गामित
  • नरेशभाई मगनभाई पटेल
  • कनुभाई मोहनलाल देसाई
Powered By Sangraha 9.0