डोंबिवली : ( K.C College ) केसी कॉलेज व हुतात्मा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने "सायबर सिक्युरिटी कायदेशीर समिक्षा" मार्गदर्शन व "भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचे प्रदर्शन व माहिती प्रकल्प" भरविण्यात आले होते.
हा कार्यक्रम बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनिल कांबळे यांनी "सायबर सुरक्षा व कायदेशीर समिक्षा" याविषयी माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
हेही वाचा : आदिवासी संस्कृतीतील ‘वाघबारस’ – निसर्गासोबत सहअस्तित्वाचा सण
"भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचे प्रदर्शन व माहिती प्रकल्प" या उपक्रमात राफेल, मिराज, सुखोई, तेजस, जग्वार, मिग २१, मिग २९ लढाऊ विमाने व ध्रुव, अपाची, चीनुक हेलिकॉप्टर यांची माहिती व महत्व विषद करताना डॉ.कांबळे यांनी भारतीय हवाई दलाचे नागरी सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीतील योगदान यावर चर्चा व प्रश्नोत्तरे घेऊन या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना बोलते केले.
हे वाचलत का ? - आकाशदिव्यांची मांदियाळी
प्रा. डॉ. सतीश कोलते रसायनशास्त्र विभाग प्रमुख, व प्रा.डॉ.मयुरेश जोशी लाइफ सायन्स विभाग यांच्या सक्रिय सहभागाने व सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. एच.आर.कॉलेजचे प्रा.डॉ.नवीन पंजाबी व प्रा.राहुल मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमासाठी नियोजन केले. २१ नेव्हल एन.सी.सी.,२७ आर्मी एन.सी.सी., ०३ एअर स्कॉड्रन एन.सी.सी.,कॅडेट्स या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.