मुंबई : (Sanjay Raut) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्याविरोधातील तक्रार नोंदवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे संजय राऊतांच्या याचं तक्रारीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत मनसेला (MNS) घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मांडलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) ही तक्रार केली होती.
हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका काय?
"महाविकास आघाडी आणि इंडी अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ह्या स्थानिक पातळीवर होणार आहे. त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक (तालुका) नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचे त्या ठिकाणचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घेणार आहेत. आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ह्या सोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेसला नाही. महाविकास आघाडीलाही नाही." अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मांडली होती. यामुळे आता महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
महाविकास आघाडीचे जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला गेलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं, मात्र सपकाळ अनुपस्थित असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, त्याबाबतच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्तर दिलं आहे. “हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे, त्या गोंधळाच्या अनुषंगाने त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता. आणि त्या हेतूच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टर ऑफिसरला भेटलेले आहे. त्यामुळे यात आघाडीचा, युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे या सगळ्या चर्चा अनावश्यक आहेत.” अशी माहिती सपकाळांनी (Harshwardhan Sapkal) दिली आहे.
सपकाळ शिष्टमंडळासोबत जाण्याऐवजी दिल्लीला का ?
“काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झालो. आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर १४ तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलावलं जातं आणि काही पक्षाचा जो नेहमीचा भाग आहे. त्या अनुषंगाने मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलावलं जातं तर मी दिल्लीला जाण हे देखील स्वाभाविक आहे. त्यामुळे मी मुंबईत होतो किंवा इतर कुठे गेलो असं नाही. मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो.” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन (Harshwardhan Sapkal) सपकाळ म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.