कुंभारवाड्यातील प्रकाशपर्व

    16-Oct-2025   
Total Views |

भारतीय संस्कृतीचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. जीवनरुपी ज्योत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी! काळाच्या ओघात आपल्या राष्ट्राने अनेक स्थित्यंतरं अनुभवली. परंतु, त्याच्या मुळाशी असलेला हा वारसा मात्र खंडित झाला नाही. आधुनिक काळात सुद्धा याच्या मुळाशी असलेला धर्मविचार समाजामध्ये चिरंतर प्रवाहित राहिला. तिमिराला भेदणारा प्रकाशाचा एक दिवा, ज्ञानरुपी सत्वाचा विचार देत असतो. असे लक्षावधी दिवे ज्यावेळी एकत्र प्रकाशमान होतात, तेव्हा आपल्या संस्कृतीच्या वैभवरुपी वारशाचेच भव्य दर्शन आपल्याला घडून येते. मात्र, हे दिवे घडवण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच चिंतनशील आहे. इथे कौशल्य आणि सृजनाचा जेव्हा मेळ घट्ट बसतो, तेव्हा आकाराला येणारा दिवा हा केवळ एक वस्तू राहत नाही, तर निर्मितीचे ते एक नवीन शिल्पच असते. मुंबईच्या धारावी येथील कुंभारवाड्यात आकाराला येणारे हे दिवे म्हणजे प्रकाशपर्वाची नवीन पहाट. त्याचीच काही क्षणचित्रे...
 
Kumbharwada Mumbai 
दिवाळीला दरवर्षी धारावीच्या कुंभारवाड्यात माती तुडवण्यापासून ते दिव्यांच्या विक्रीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया संथ गतीने सुरु असते. गजबजलेल्या मुंबईच्या पोटात एका आगळ्यावेगळ्या सृजनाची ओळख यावेळी होते. दैनंदिन व्यवहारासोबतच दिवाळीची लगबग सुरु असते.

Kumbharwada Mumbai 
‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार‌’ हे बापूजींच्या आवाजात आपण नेहमीच ऐकत असतो. त्याची ही कुंभारवाड्यातील दृश्य प्रचिती...

Kumbharwada Mumbai 
कुंभारवाड्यातील घड्यांसोबत आकाराला येणारे मातीचे दिवे, भट्टीतून तयार होत आपलं रुप पक्कं करतात.

Kumbharwada Mumbai
 
दिव्यांची निर्मिती हे कुंभारवाड्यातील अनेक महिलांचे या काळातील उपजीविकेचे साधन. घड्यांसोबतच, मातीचे दिवे तयार करत रोजगाराला पाठबळ मिळते.
 
Kumbharwada Mumbai 
मातीचे दिवे घडवण्याची प्रक्रिया ही समूहाची प्रक्रिया आहे. कारागिरांच्या हातून दरसाल अशा हजारो दिव्यांची निर्मिती होते. या प्रक्रियेमध्ये तहान-भूक विसरुन, हे कारागीर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये रममाण होतात.

Kumbharwada Mumbai
 
हजारो दिव्यांची निर्मिती ज्या कुंभारवाड्यामध्ये होते, तिथून देशभरामध्ये या दिव्यांचा प्रवास सुरु होतो. मुंबईच्या एका वस्तीमध्ये तयार होणारे हे दिवे, देशाचा कानाकोपरा उजळून काढतात.

Kumbharwada Mumbai 
अखेर तयार झालेले हे दिवे, आपल्या प्रवासाच्या नव्या पर्वासाठी सज्ज होतात.
 
- संकलन : मुकुल आव्हाड,  छाया : अजिंक्य सावंत

 
 

 
 
 

 
 
 
 

 

 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.