मुंबई : (Info Edge) सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेले दिवाळी गिफ्टचे व्हिडीओ तुम्हीही पाहिलेच असाल. हे व्हिडीओ आहेत इन्फो एज कंपनीमधील, या कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचांऱ्याना व्हीआयपी सुटकेसचा एक संच, स्नॅक्सचा एक बॉक्स आणि इलेक्ट्रिक दिवा अशा भेटवस्तू दिल्या आहेत.
दरम्यान, इन्फो एज (Info Edge) कंपनीमधील अनेक कर्मचाऱ्यांनी या गिफ्टसचे व्हिडीओ बनवत ते सोशल मिडियावर शेअर केले आहेत. “तुम्हारे ऑफिस में मिलती होगी सोन पापडी… हमारे यहाँ ये सब मिलता है,”, “बडे दिल वाला दिवाली बिहेविअर” आणि "तुम्हारे ऑफिस मैं मिलता हैं क्या ऐसा गिफ्ट" अशा निरनिराळ्या कॅप्शनसह आता हे व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालतायेत.
इन्फो एज (Info Edge) ही एक भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी Naukri.com (भरती), 99acres.com (रिअल इस्टेट), Jeevansathi.com (विवाह) आणि Shiksha.com (शिक्षण) सारख्या आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे संचालन करण्यासाठी ओळखली जाते. १९९५ मध्ये स्थापित, ही कंपनी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान गुंतवणूकदार देखील आहे, जी झोमॅटो आणि पॉलिसीबाजार सारख्या यशस्वी स्टार्टअप्सना पाठिंबा देते.
या रीलवर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक लोकांनी रील्सवर लाईक, शेअर आणि कमेंट केल्या आहेत. शिवाय कंपनीचे देखील कौतुक केले आहे. तर काही लोकांनी व्हिडीओला एआय जनरेटेड म्हटलं आहे. काही लोकं या रील्सला रिप्लाय देणाऱ्या रील्स बनवत आहेत. 'कहा मिलती हैं ऐसी कंपनी' अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. मात्र या सर्वच रील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.