मुंबई (महाराष्ट्र)
मुंबईत दिवाळी ( Diwali ) म्हणजे गजबजलेल्या गल्ली बोळांत फेरी लाईट्सचा झगमगाट, मातीचे दिवे आणि रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी. सोबतच इथल्या सोसायट्यांमधील सामूहिक पूजा आणि फॅन्सी डेकोरची स्पर्धा दिवाळीला आधुनिकता देते.
वाराणसी (उत्तर प्रदेश)
वाराणसीची दिवाळी ( Diwali ) म्हणजे दिव्यांचा खरा महोत्सव! गंगाघाटांवर हजारो दिव्यांनी सजलेली आरती, आकाशात फटाक्यांची आतिषबाजी आणि नद्यांच्या प्रतिबिंबात उजळलेलं शहर. हे दृश्य अक्षरक्ष: 'स्वर्गीय' भासते.
अमृतसर (पंजाब)
अमृतसरमध्ये दिवाळी ( Diwali ) आणि गुरू नानक जयंती हे सण एकत्र येतात. त्यामुळे सुवर्ण मंदिरात हजारो दिवे लावून दिवाळी ( Diwali ) साजरी केली जाते. या पवित्र क्षणी दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेला हा परिसर डोळ्यांना सुखावणारा असतो.
गोवा
गोव्यातील दिवाळीच ( Diwali ) आकर्षण म्हणजे ‘नरकासुर दहन’. गोव्यात नरक चतुर्दशीला नरकासुराचा भव्य पुतळा बनवून तो फटाक्यांची आतिषबाजी करत जाळला जातो. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळते.
कोलकाता (पश्चिम बंगाल)
कोलकात्यात दिवाळीच्या ( Diwali ) दिवशी ‘काली पूजन’ विशेष महत्त्वाचं मानलं जातं . देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी केली जाते. मंदिरे आणि घरांमध्ये विशेष सजावट, फुलांची आरास आणि दिव्यांचा झगमगाट दिसतो.