कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी, व्हिडिओ व्हायरल!

16 Oct 2025 19:07:36
Kapil Sharma
 
मुंबई : (Kapil Sharma's Kap's Cafe) प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या ‘कॅप्स कॅफे’मध्ये (Kapil Sharma's Kap's Cafe) तिसऱ्यांदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गोळीबाराची जबाबदारी पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली असून, यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप तपशीलांची पुष्टी केलेली नाही, परंतु व्हिडिओमुळे कार्यक्रमस्थळी सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
 
हेही वाचा -  Mumbai Local Viral Video : डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल... राममंदिर स्टेशनवर तरुणाने केली महिलेची सुखरूप प्रसूती
व्हायरल व्हिडिओमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी (Kapil Sharma's Kap's Cafe)  कॅफेच्या दिशेने सलग गोळ्या झाडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ही घटना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. गोळीबारानंतर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आमचा कोणत्याही सामान्य जनतेशी वैयक्तिक वैर नाही; हे लोक काम झाल्यावर पैसे देत नाहीत.”
 
या कॅफेवर (Kapil Sharma's Kap's Cafe)  यापूर्वीही दोनदा हल्ले झाले होते आणि नुकतेच त्याचे नुतनीकरण करून पुन्हा उघडण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अशाप्रकारचा हल्ला झाल्याने सार्वजनिक सुरक्षा यंत्रणांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.घटनेनंतर कॅनडातील पोलिस आणि भारतीय तपास यंत्रणांनी संयुक्त तपास सुरू केला असून, (Kapil Sharma's Kap's Cafe)  कॅफे परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0