तिलारीच्या जंगलातून केसाळ गोगलगायीचा शोध

15 Oct 2025 13:25:01
new species of snail


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारीच्या निम-सदाहरित जंगलामधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of snail). ही प्रजातीचा शंख केसाळ असल्यामुळे तिचे इंग्रजीमधील सर्वसामान्य नाव तिलारी हेरी स्नेल असे ठेवण्यात आले असून शास्त्रीय नामकरण लॅगोकाईलस हायाओमियाझाकी, असे करण्यात आले आहे (new species of snail). या शोधाच्या निमित्ताने या गोगलगायीच्या लॅगोकाईलस या कुळाची उत्तर पश्चिम घाटातील ही पहिलीच नोंद ठरली आहे (new species of snail). ज्यामुळे या कुळाचा ज्ञात विस्तार तब्बल ५४० किमीने वाढला आहे (new species of snail).
 
 
तिलारीचा परिसर जैवविविधतेने समृद्ध मानला जातो. आता या जैवविविधेत अजून एका गोगलगायीच्या प्रजातीची भर पडली आहे. चंदगड तालुक्यातील तिलारीच्या रातोबा पाॅईन्ट येथून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या शोधासंबंधीचा शोधनिबंध जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजि (Journal of Conchology) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक डॉ. अमृत भोसले, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि स्वप्नील पवार, राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक डॉ. दिनारझार्दे रहीम यांचा सहभाग आहे. भारतामध्ये गोगलगायीच्या लॅगोकाईलस या कुळामध्ये १२ प्रजाती सापडतात. या नव्या प्रजातीच्या शोधामुळे गोगलगायींची संख्या १३ झाली आहे.
 
 
नव्या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध जपानी अ‍ॅनिमेटर, चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून मानव आणि निसर्ग यांच्यातील नातेसंबंध अतिशय सुंदर रीतीने साकारल्यामुळे त्यांच्या नाव या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. लॅगोकाईलस हायाओमियाझाकी गोगलगाईचे सर्वसामान्य इंग्रजी नाव हे तिच्या आढळ क्षेत्रावरून तिलारी हेरी स्नेल (Tilari Hairy Snail) असे ठेवण्यात आले आहे. या प्रजातीचा शंख हा ४.१७ ते ५.६० मिमी उंच आणि ४.१६ ते ५.२३ मिमी रुंद असतो. पश्चिम घाटातील गोगलगायिंनबद्दल अद्याप तुलनेने कमी संशोधन झाले आहे. ही प्रजाती जैवविविधतेसाठी महत्त्वाची असून तिचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. स्थानिक परिसंस्थेमध्ये या नवीन प्रजातीची भूमिका समजून घेण्यासाठी गोगलगायइंवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे असे या प्रजातीचे संशोधक डाॅ. अमृत भोसले यांनी सांगितले.
 
पश्चिम घाटातील जंगलातील पानांच्या पालापाचोळ्यात आणि दगडांवर या लहान गोगलगायींचा अधिवास आढळतो. या गोगलगायींचा अधिवास अत्यंत मर्यादित असून जंगलातील वनव्यांमुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्या नामशेष होण्याची शक्यता आहे. लहान गोगलगायी या निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत तसेच ते अन्नसाखळीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. गोगलगायीसारख्या आकाराने लहान प्रजाती संशोधनाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे भविष्यात ठाकरे वाइल्ड लाईफ फौंडेशन च्या माध्यमातून अश्या प्रजातींच्या संशोधनावरती भर दिला जाईल. - तेजस ठाकरे, संशोधक
Powered By Sangraha 9.0