मुंबईत कार्यरत ‘ज्ञानयोगी वारकरी मंडळ’ ही संस्था भक्ती, सेवा आणि समाजजागृती यांचा जिवंत संगम. वारकरी परंपरेतील नामस्मरण, भजन, कीर्तन आणि वारी यांच्या माध्यमातून समाजातील अंधकार दूर करण्याचे कार्य मंडळ करत आहे. संतपरंपरेच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली कार्य करणारी ही संस्था आज सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये एक आदर्श उदाहरण बनली आहे. भक्तीला समाजसेवेचे माध्यम बनवणारी मंडळं ही वारकरी संस्कृतीची जिवंत शिदोरी आहे.
नयोगी वारकरी मंडळ, घाटकोपर’ (मुंबई) हे नाव आज महाराष्ट्रभर भक्ती, सेवा आणि समाजजागृतीच्या संदर्भात आदराने घेतले जाते. ही संस्था केवळ नामस्मरणापुरती मर्यादित नसून, भक्तीच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक स्तरावर परिवर्तन घडवण्याचे कार्य करते. मंडळाची स्थापना गुरुवर्य ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत नारायण बाबा आणि संत रोहिदास बाबा यांच्या प्रेरणेने झाली. त्यांच्या शिकवणुकीतून भक्तिभावासोबतच समाजोपयोगी कार्य करण्याची वृत्ती रुजली.
सध्या संस्थेचे मार्गदर्शन हरिभक्तपरायण पोपट बाबा चकवे यांच्या आध्यात्मिक नेतृत्वाखाली होत आहे. पोपट बाबांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यकर्ते आपल्या भक्तिभावाला सामाजिक उत्तरदायित्वाशी जोडत महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. त्यांनी वारकरी परंपरेतील दिंडी, वारी, हरिपाठ आणि कीर्तन यांच्या माध्यमातून तरुण पिढीत संतपरंपरेची ओळख निर्माण केली आहे.
‘ज्ञानयोगी वारकरी मंडळा’ने मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्रांमध्ये भक्ती व समाजसेवेचे अनोखे उपक्रम राबविले आहेत. अनाथ, वृद्धाश्रम, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहिमा, महिला सक्षमीकरण कार्यक्रम तसेच पर्यावरणजागृती मोहिमांद्वारे मंडळाने समाजाच्या प्रत्येक घटकाला आधार दिला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये गावोगावी जाऊन लोकांना भक्तिमार्गाने जीवनमूल्यांचा संदेश देणे, तसेच संतसाहित्याचा अभ्यास करून पिढ्यान्पिढ्या विचार पोहोचवणे, या उपक्रमांतून मंडळ सामाजिक जागृती साधत आहे.
मंडळाने वारकरी परंपरेतला संपूर्ण महाराष्ट्रभर भजन-कीर्तन, दिंडी वारी, हरिपाठ स्पर्धा यांचाही उत्साह वाढविला आहे. या कार्यक्रमांतून हजारो युवक-युवती, महिला आणि मुले सहभागी होतात. व्यसनमुक्ती मोहिमा, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आणि आरोग्य शिबिरे यांमुळे समाजातील दुर्बल घटकांना नवसंजीवनी मिळते. या सर्व उपक्रमांमुळे मंडळाने भक्तीला सामाजिक उपयोगी आणि परिवर्तनकारी साधन म्हणून सिद्ध केले आहे.
पंढरपुरातील भक्तिसंकुल - वारकरी भवनांची प्रतीक्षा
या मंडळाचा सध्याचा सर्वांत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पंढरपुरातील भक्तिसंकुल (वारकरी भवन) उभारणे. या संकुलाद्वारे महाराष्ट्रभरातील वारकर्यांना एकत्र आणून भजन, कीर्तन, अभंग, हरिपाठ आणि संतविचाराचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. हे संकुल फक्त निवासस्थान नसून, वारकरी संस्कृतीचं, संतपरंपरेचं आणि समाजसेवेचे केंद्र बनेल, अशी मंडळाची दृढ इच्छा आहे. भक्तिसंकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग, संगीत प्रशिक्षण, अभंग-कीर्तन कार्यशाळा, संतसाहित्य अध्ययन आणि सामाजिक सेवा उपक्रम यांचं आयोजन होणार आहे. गेली दहा वर्षे मंडळाने प्रशासन आणि शासनाकडे सातत्याने निवेदन आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे विनंती केली आहे आणि यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या भवनाच्या माध्यमातून वारकरी समाजाच्या प्रत्येक सदस्याला एकत्र आणून सामाजिक समरसतेचा संदेश देण्याचं उद्दिष्ट साध्य होईल, असा मंडळाचा ठाम विश्वास आहे. भक्तिसंकुल उभारल्यास मंडळाचे उपक्रम अधिक स्थायी होणार आहेत. मुंबईसह राज्यभरातील वारकर्यांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण, साधना आणि सेवा करण्याची सुविधा मिळणार आहे. हे भवन वारकरी परंपरेचा वारसा जपण्यासाठी, संतपरंपरेचे विचार पिढ्यान्पिढ्या पोहोचवण्यासाठी आणि भक्तीच्या माध्यमातून समाजोन्नती साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असा मंडळाच्यावतीने विश्वास व्यक्त केला जात आहे.
वारकरी परंपरेतील ‘भक्ती’ हे केवळ व्यक्तिगत साधना नसून समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचं माध्यम आहे. ‘ज्ञानयोगी वारकरी मंडळा’ने हा संदेश प्रत्येक वारी, कीर्तन, भजन आणि हरिपाठाद्वारे दिला आहे. हजारो भाविक मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये सामील होऊन भक्तीचा आनंद अनुभवतात आणि सामाजिक, सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक शिक्षण घेतात. आजही प्रत्येक वारकरी आपल्या अंतःकरणात एकच भावना घेऊन वाट पाहात आहे, श्रीक्षेत्र पंढरपुरात उभं राहो, ज्ञानयोग वारकरी भक्तिसंकुल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभर विठ्ठलनामाचा गजर पोहोचो. भक्तिसंकुलाची प्रतीक्षा ही केवळ इमारतीची नाही, तर संपूर्ण वारकरी समाजाची, भक्तीच्या माध्यमातून समाजोन्नती साधण्याची प्रतीक्षा आहे.
पंढरपुरातील भक्तिसंकुल हे श्रद्धेचे स्वप्न शासनाने साकारावे
आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात पंढरपुरातील भक्तिसंकुलाचे स्वप्न जपले आहे, असे मी स्वतः व्यक्त करतो. हे संकुल केवळ इमारत नसून, महाराष्ट्रभरातील वारकरी भाविकांसाठी आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र बनेल. आम्ही शासन आणि प्रशासनाकडे विनंती करतो की, या प्रकल्पाला त्वरित स्थायित्व आणि सहकार्य दिले जावे, जेणेकरून भक्तीच्या माध्यमातून समाजाची उन्नती साधता येईल. प्रत्येक वारी, प्रत्येक कीर्तन आणि अभंगाच्या माध्यमातून आम्ही वारकरी संस्कृतीचा प्रसार करत आलो आहोत. भक्तिसंकुलाचे आशीर्वाद मिळाल्यास हा कार्यप्रवाह आणखी प्रभावी बनेल आणि महाराष्ट्रभर भक्तीची ज्वाला उजळून पसरली जाईल.
- हभप दशरथ बाबा भणगे
- ज्ञानयोगी वारकरी मंडळ, अध्यक्ष, मुंबई
प्रत्येक कार्य आणि उपक्रम हा भक्तीचा नाद
‘ज्ञानयोगी वारकरी मंडळा’ने समाजाच्या दुर्गट घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे जे उपक्रम राबविले आहेत, त्यासाठी निधी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पंढरपुरातील भक्तिसंकुलाच्या उभारणीसाठी आम्ही शासन आणि प्रशासनाकडे विनंती करतो की, याला प्राधान्य द्यावे. संकुल उभारल्यास महाराष्ट्रभरातील वारकरी समाजाच्या सेवेसाठी आणि भक्ती-प्रसारासाठी स्थायी व्यासपीठ तयार होईल. आमच्या कामात प्रत्येक कार्य आणि देणगी हेच सुनिश्चित करते की, भक्ती आणि सेवा यांचा प्रवास अखंडित सुरू राहावा.
- हभप भगवान बाबा देसाई,
ज्ञानयोगी वारकरी मंडळ, खजिनदार, मुंबई, संपर्क क्र : ९८९२३४७२०८
- सागर देवर