मुंबई : (Maharashtra Pollution Control Board) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांनी यंदाच्या दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने दिवे लावून सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी (Diwali) म्हणजे दिव्यांचा सण, तो त्याच पद्धतीने साजरा केला पाहिजे, पर्यावरणाची निगा राखली पहिजे. याच उद्देशाने ‘शहाणपण देगा देवा’ या आकर्षक संदेशासह मंडळाने सोशल मीडियावर ‘#MPCBDiyaChallenge’ सुरू केले आहे.
दिवाळी (Diwali) म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकतेचा सण. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाक्यांऐवजी पारंपरिक मातीच्या दिव्यांचा प्रकाश पसरवून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. सोबतच आपले दिवाळीतील प्रकाशमय क्षण ‘#MPCBDiyaChallenge’ हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर शेअर करावेत, आम्ही तुमची परंपरागत दिवाळी जगभर दाखवू , असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ((Maharashtra Pollution Control Board)) करण्यात आले आहे.
परिवारासोबत दिवे लावून घर अंगण उजळविण्याची परंपरा पुढे नेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (MPCB) हा उपक्रम राबविण्यात येत आहे.