Maharashtra Cabinet Decision : 'या' विभागात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक, काय आहेत मंत्रिमंडळ निर्णय...

14 Oct 2025 16:51:59
devendra fadanvis
 
मुंबई : (Maharashtra Cabinet Decision) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३ महत्वाचे निर्णय घेण्यात आले . ज्यात उद्योग आणि सामाजिक न्याय या विभागांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथिगृह (Sahyadri Guest House) येथे झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.
 
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
 
१. उद्योग विभाग (Industries Department)
 
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार.
राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय.
 
 हेही वाचा : अमेरिकी काँग्रेसचे तरी ट्रम्प ऐकणार का?
२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (Social Justice and Special Assistance Department)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 'द पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद.
 
हे वाचलात का ? :  किती चुकांची कबुली देणार?
३. विधि व न्याय विभाग (Law and Justice Department)
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरिता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
 
Powered By Sangraha 9.0