Coldrif Cough Syrup बनवणाऱ्या कंपनीला कायमचं टाळं! तामिळनाडू सरकारकडून उत्पादन परवाना रद्द

14 Oct 2025 12:38:34

Coldrif Cough Syrup
 
मुंबई : (Coldrif Cough Syrup) गेल्या महिनाभरात देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे (Coldrif Cough Syrup) अनेक बालकांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत या कफ सिरपचे सेवन केल्याने २२ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी कोल्ड्रिफ कफ सिरप (Coldrif Cough Syrup) बनवणारी श्रीसन फार्मास्युटिकल कंपनी बंद करण्याचे आदेश देत कंपनीचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हेही वाचा -  किती चुकांची कबुली देणार?
 
काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू सरकारने या फार्मास्युटिकल कंपनीला त्यांचा औषध परवाना (ड्रग लायसन्स) रद्द का करू नये? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता सरकारने थेट औषध परवाना रद्द‌ केला आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी कोल्ड्रिफ कफ सिरप (Coldrif Cough Syrup) बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तामिळनाडू सरकारने संबंधित कंपनीवर आणखी एक मोठी कारवाई केली आहे.
 
हे वाचलंत का? -  “जिथे शक्य तिथे युती, नाहीतर समोरा-समोर लढू"; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्याचं मोठं विधान!
 
तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांना या कोल्ड्रिफ कप सिरप (Coldrif Cough Syrup) बनवणाऱ्या कंपनीबाबत अनेक गंभीर गोष्टी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीकडे योग्य उत्पादन पद्धती आणि चांगल्या प्रयोगशाळा नव्हत्या, या कंपनीने अनेक नियमांचं उल्लंघन केल्याची नोंद तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्याऱ्यांनी नोंदवली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0