शिंदेंच्या काळातील योजना बंद होणार? विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

14 Oct 2025 16:58:20
 मुंबई : (CM Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुरु केलेल्या योजना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बंद करण्यात येत असल्याचा दावा उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. कोण कोणत्या योजना फणवीसांकडून बंद करण्यात येत आहे याची यादीच दानवेंनी ट्विट केली आहे. यात एकून आठ योजना असल्याच्या दानवेंच्या दाव्यावर फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. 
दानवेंच्या आरोपांवर काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
“अंबादासजींना (Ambadas Danve) किमान शिंदेसाहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, हे देखिल महत्वाचं आहे. पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही. सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे. कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही.
एखादं दुसरी योजना ही काही काळासाठी डेफर (स्थगित) होऊ शकते. कारण आता आमच्यावर या संकटांमुळे (पुरस्थितीमुळे) एक मोठा भार पडलेला आहे. पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण केलेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं नाही, की कुठली योजना बंद होईल.” असं यावेळी दानवेंच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले... “ज्या आमच्या फ्लकशीप योजना आहेत. ज्यात लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातील कुठलीच योजना आमची बंद होणार नाही.” असं मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट केलं.
अंबादास दानवेंचा दावा नेमका काय?
उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विट करत फडणवीस (CM Devendra Fadnavis) सरकावर शिंदेंच्या काळाती योजना बंद करत असल्याचा आरोप केला. दानवेंचं ट्विट नेमकं काय होतं ते पाहू...

<!-- Inject Script Filtered -->
“सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील..
 
शिंदेंच्या 'या 'योजना बंद..
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा - बंद!
३. १ रुपयात पीकविमा - बंद!
४. स्वच्छता मॉनिटर - बंद!
५. १ राज्य १ गणवेश - बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!
७. योजनादूत योजना - बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.”
असं ट्विट दानवेंनी (Ambadas Danve) केलं होतं.


Powered By Sangraha 9.0