सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चर्मकार समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार!

14 Oct 2025 14:05:19
 
CJI Bhushan Gavai
 
मुंबई : (CJI Bhushan Gavai) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर न्यायालयात सुनावणीदरम्यान बूट फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
 
हेही वाचा -  Coldrif Cough Syrup बनवणाऱ्या कंपनीला कायमचं टाळं! तामिळनाडू सरकारकडून उत्पादन परवाना रद्द
 
सरन्यायाधीश गवईंवर (CJI Bhushan Gavai) झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता धडकणार आहे. त्यात धारावीतील चर्मकार समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे. राकेश किशोर तिवारी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलाने हे कृत्य केलेले असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केली आहे.
 
हे वाचलंत का? - अमेरिकी काँग्रेसचे तरी ट्रम्प ऐकणार का?
 
जनमानसांत संविधानाप्रती जागृती व आदर असावा यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयाच्या प्रांगणामध्ये हातामध्ये संविधान असलेले महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. देशातील प्रत्येक न्यायालयातील न्यायाधीशांना कडक सुरक्षा देण्यात यावी. देशाच्या आणि राज्यांच्या राजशिष्टाचारानुसार प्रत्येक न्यायाधीशांचा सन्मान ठेवण्यात यावा. यांसह इतर महत्त्वाच्या मागण्या संघटनेच्या राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0